पश्‍चिम रेल्वेवर सौरऊर्जा प्रकल्प! 

पश्‍चिम रेल्वेवर सौरऊर्जा प्रकल्प! 

मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांवर सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 362 किलोवॉटचा प्रकल्प राबवण्यात येईल. त्यातून महिन्याला चार लाख 75 हजार युनिट वीज निर्माण होणार आहे. भविष्यात सर्व स्थानकांवर सौरऊर्जा प्रकल्प राबवले जाण्याची शक्‍यता आहे. अंधेरी आणि वांद्रे टर्मिनस स्थानकाच्या छतावर हा प्रकल्प उभारण्यात येईल. 

चर्चगेट रेल्वेस्थानकात सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. अद्याप हा प्रकल्प कागदावरच होता. केंद्रातील भाजप सरकारने अपारंपरिक ऊर्जानिर्मितीला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत रेल्वेने हरित ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. चर्चगेट, दादर, वांद्रे टर्मिनस आणि अंधेरी स्थानकापासून ही सुरुवात होणार आहे. याचे उद्‌घाटन बुधवारी रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांच्या हस्ते होणार आहे. 

खासगी-सरकारी भागीदारीतून हे काम "हीरो सोलर' या कंपनीला देण्यात आले आहे. निर्माण झालेल्या विजेतील काही हिस्सा या कंपनीला देण्यात येईल. महिन्याला या सर्व प्रकल्पांतून चार लाख 75 हजार युनिट वीजनिर्मिती होणार आहे. त्यातून रेल्वेची 24 लाख 7 हजार रुपयांची बचत होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com