कल्याण: टाउनशिप प्रकल्पासाठी द. कोरियाच्या कंपनीचे अर्थ सहाय्य

Dombivli
Dombivli

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अडीचशे हेक्टरवरील प्रस्तावित टाउनशिप प्रकल्पासाठी अर्थ सहाय्य करण्यासाठी दक्षिण कोरियाची लॅन्ड अॅन्ड हाउसिंग कंपनी तयार झाली आहे. कंपनीचे अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पार्क सँग वू यांच्या नेतृत्वाखालील कोरियन शिष्टमंडळाने आज पालिका मुख्यालयात महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त पी वेलारसू तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे त्यांनी वाडेघर परिसरातील प्रस्तावित जागेचीही पाहणी केली. 

2015 मधे झालेल्या सामंजस्य करारानुसार दक्षिण कोरिया भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. या अंतर्गत त्यांनी कडोमपाच्या टाउनशिपच्या प्रस्तावित प्रकल्पाची निवड केली आहे. दक्षिण कोरियाची लॅन्ड अॅन्ड हाउसिंग या सरकारी कंपनीचे कार्यकारी अधिकारी तसेच अध्यक्ष पार्क सँग वू यांच्यासह कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे संचालक ली जिआँग वूक, मुख्य सल्लागार ली कि येओल, भारतीय स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालक काँग कू हवँग, संचालक किम सँग हो, ओ से चँग, व्यवस्थापक पार्क च्यूआँग सिओ तसेच भारतातील संचालक सन याँग हून यांनी आज पालिकेस भेट दिली. याप्रसंगी महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त पी वेलारसू यांच्यासह उपमहापौर मोरेश्वर भोईर, विरोधी पक्ष नेते मंदार हळबे, सेना गटनेते रमेश जाधव, भाजपा गटनेता वरुण पाटील, महिला बाल कल्याण समिती सभापती वैशाली पाटील उपस्थित होते. 

मुंबईलगत असलेल्या शहरात विस्ताराची असलेली क्षमता, भौगोलिक रचना तसेच नदी किनारा या कारणांमुळे कल्याण डोंबिवली पालिकेस आर्थिक मदत देण्याचा विचार कंपनीने केला असे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष पार्क सँग वू यांनी सांगितले. ही मदत किती असेल याबाबत योजनेचा आराखडा तयार झाल्यावर सांगला येईल असेही वू म्हणाले. या प्रकल्पात कंपनीबरोबरच खाजगी गुंतवणूकदार तसेच पालिकाही गुंतवणूक करणे अपेक्षित असल्याचे वू यानी स्पष्ट केले. मात्र यातील त्यांचा सहभाग तसेच अन्य गुंतवणूकदारांनी किती वाटा उचलायचा आहे हे चर्चेनंतर निश्चित होईल. 

येत्या एक ते दिड वर्षात हा प्रकल्प मार्गी लावण्याचा पालिकेचा प्रयत्न राहील असे आयुक्त पी वेलारसू यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी जी जागा निवडण्यात आली आहे तिथे हरित पट्टा तसेच ना विकास क्षेत्र आहे. राज्य सरकारकडे प्रकल्पासंदर्भातील बदल करण्याच्या उद्देशाने नगररचना विभागाकडून प्रस्ताव पाठवण्यात आल्याचेही वेलारसू म्हणाले. येथील जमीन मालिकाना ग्रोथ सेंटरच्या धर्तीवर मोबदला ज़िला जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या प्रकल्पामुळे शहराचा चेहरा बदलेल अशी आशा महापौर देवळेकर यांनी व्यक्त केली. 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज पाचवा स्मृती दिन आहे याचे औचित्य साधत शिष्टमंडळाने काळा तलाव येथील त्यांच्या स्मारकास भेट दिली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com