दहशतवाद्यांशी लढण्यासाठी रेल्वे पोलिसांची खास पथके

मंगेश सौंदाळकर
बुधवार, 31 मे 2017

स्थानकांत 24 तास गस्त सुरू; लोकलमध्येही लक्ष
मुंबई - घातपाती कारवाया रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. बुलेटप्रूफ जॅकेट, कार्बाईन, एके-47 रायफली घेऊन हे पोलिस रेल्वे स्थानकांत 24 तास गस्त घालत आहेत. त्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारची पथके रेल्वेने तयार केली आहेत.

मुंबईवरील 26/11 हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी सीएसटी स्थानकात बेछूट गोळीबार केला होता. दहशतवाद्यांना रोखण्याकरिता रेल्वे पोलिसांनी पुरेपूर प्रयत्न केले. या हल्ल्यात रेल्वे पोलिस, होमगार्ड हुतात्मा झाले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी घेतली आहे. असा हल्ला झाल्यास एनएसजी, फोर्स वन येईपर्यंत दहशतवाद्यांशी दोन हात करता यावेत, यासाठी प्रत्येक रेल्वे पोलिस ठाण्यात पथक तयार करण्यात आले आहे. दहशतवाद्यांशी प्रथम हे पोलिसच सामना करतील. त्यानंतर इतर यंत्रणांची मदत घेतली येईल. या पथकांतील पोलिस 24 तास रेल्वेच्या हद्दीत फिरत आहेत. ते लोकलमधूनही प्रवास करत आहेत.

सुरक्षेचा विचार करून प्रथमच रेल्वे पोलिसांची अशी पथके तयार केलेली आहेत. ही पथके 24 तास गस्त घालतील. दहशतवादी हल्ल्यासारखी घटना घडल्यास ही पथके त्यांच्याशी सामना करतील.
- निकेत कौशिक, रेल्वे पोलिस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई