टॅक्‍सीचालकाची वडाळ्यात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

मुंबई - गेल्या वर्षी पूर्व द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे मानसिक तणावाखाली असलेला टॅक्‍सीचालक मंगरू वर्मा याने शुक्रवारी (ता. 26) गळफास घेऊन आत्महत्या केली.

मंगरू (वय 36) शुक्रवारी सायंकाळी वडाळा येथील घरी मृतावस्थेत आढळला. गेल्या वर्षी झालेल्या अपघातात त्याच्या कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्यापासून तो मानसिक तणावाखाली होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा कयास आहे. गेल्या वर्षी 5 नोव्हेंबरला पूर्व द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात टॅक्‍सीतील नऊ प्रवाशांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर तिघे गंभीर जखमी झाले होते. हे कुटुंब मुंबादेवीच्या दर्शनासाठी जात होते. टॅक्‍सीचालक मंगरू याचे टॅक्‍सीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला होता.