डॉक्‍टरांवरील हल्ल्यातील तिसरा आरोपीही अटकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

मुंबई - एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतदेहांच्या कपाळावर क्रमांक टाकणाऱ्या केईएम रुग्णालयातील डॉक्‍टरांवर हल्ला केल्याप्रकरणी तिसऱ्या आरोपीलाही भोईवाडा पोलिसांनी रविवारी (ता. 1) अटक केली. जितेंद्र कुलकर्णी असे त्याचे नाव आहे.

या प्रकरणात नीलेश धुमाळ आणि युवराज दाखले या दोघांना शनिवारी (ता. 30) अटक झाली होती. हे सर्व आरोपी पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी असून, शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यासाठी ते मुंबईत आले होते, असे पोलिसांना सांगितले. मृतदेहाच्या कपाळावर क्रमांक असलेले स्टिकर चिकटवण्यात आल्याने सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात असल्याने अतिरिक्त पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सोशल मीडियातून याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पुण्यातून मुंबईत आलेल्या सहा जणांनी शनिवारी (ता. 30 सप्टेंबर) केईएम रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. हरी पाठक यांच्यावर हल्ला केला. हल्ला करणाऱ्यांपैकी नीलेश आणि युवराज यांना त्याचदिवशी अटक झाली. जितेंद्रला रविवारी अटक झाली. इतर तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉक्‍टरांच्या कपाळावर "शून्य' लिहिण्याचा प्रयत्न केल्याची कबुली या तिघांनी दिली आहे.