कोपरखैरणेत गॅसच्या स्फोटात तिघे जखमी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

तुर्भे - कोपरखैरणे सेक्‍टर 19 मधील श्री रामकृष्ण अपार्टमेंटमधील गॅस पाईपलाईनला लागलेल्या गळतीची तपासणी करताना झालेल्या स्फोटात महिलेसह तीन जण जखमी झाले. त्यांना पालिकेच्या वाशीतील रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना रविवारी (ता. 15) रात्री घडली. 

नरेश चौधरी, शिवा देशमुख, सीमा नायर अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्या तोंडाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. यातील नरेश चौधरी गॅस पाईपलाईन रिपेरिंग मॅकॅनिक आहेत. गॅसच्या पाईपलाईनला गळती लागल्याचे लक्षात आल्याने चौधरी चेकिंगसाठी श्री रामकृष्ण अपार्टमेंटमधील सीमा नायर यांच्या घरी आले होते. त्यांनी गॅसची पाईपलाईन दुरुस्त केल्यानंतर गॅस सुरू केला तेव्हा कॅप उडून स्फोट झाला. त्यात हे तिघेही जखमी झाले. याबाबत पोलिसांना विचारले असता, हा गॅसचा स्फोट असल्याचे त्यांनी सांगितले; परंतु इमारतीमधील रहिवाशांनी हा गॅसचा स्फोट नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा नेमका कशाचा स्फोट होता, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.