चौपाट्यांच्या स्वच्छतेकरिता "एमएमबी'चा पुढाकार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

मुंबई - देशातील स्वच्छ चौपाटी म्हणून ओळख निर्माण झालेल्या "वर्सोवा चौपाटी'चा पॅटर्न आता राज्यभर राबवला जाणार आहे. चौपाट्यांच्या स्वच्छतेकरिता एमएमबीने पुढाकार घेतला आहे. जनजागृतीकरिता महाराष्ट्र सागरी मंडळ (एमएमबी) आता स्थानिकांना वाळू शिल्पाचे प्रशिक्षण देणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एमएमबीच्या कॉफीटेबल बुकचे रविवारी (ता. 4) प्रकाशन केले. 

मुंबई - देशातील स्वच्छ चौपाटी म्हणून ओळख निर्माण झालेल्या "वर्सोवा चौपाटी'चा पॅटर्न आता राज्यभर राबवला जाणार आहे. चौपाट्यांच्या स्वच्छतेकरिता एमएमबीने पुढाकार घेतला आहे. जनजागृतीकरिता महाराष्ट्र सागरी मंडळ (एमएमबी) आता स्थानिकांना वाळू शिल्पाचे प्रशिक्षण देणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एमएमबीच्या कॉफीटेबल बुकचे रविवारी (ता. 4) प्रकाशन केले. 

राज्यात पर्यटनाचा विकासाकरिता एमएमबी विविध उपक्रम हाती घेत आहेत. "एमएमबी'ने चौपाट्यांवरील अतिक्रमणांवर कारवाईला सुरवात केली आहे. अतिक्रमणामुळे चौपाट्या मोकळा श्‍वास घेत आहेत. पर्यटनासोबत स्थानिकांना रोजगार मिळण्याकरिता "एमएमबी'ने कृती आराखडा तयार केला आहे. मुंबईतल्या वर्सोवा चौपाटीवर स्थानिकांनी केलेल्या स्वच्छतेच्या कामाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात' या कार्यक्रमात घेतली होती. राज्यातील चौपाट्यांच्या स्वच्छतेकरिता आता "वर्सोवा' पॅटर्न राबवला जाणार आहे. निर्मल सागर अभियानांतर्गत हा प्रयोग राज्यातील चौपाट्या आणि खाड्यांमध्ये राबवला जाणार असल्याचे एमएमबीचे सीईओ अतुल पाटणे यांनी सांगितले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एमएमबीने रविवारी वर्सोवा चौपाटीवर कार्यक्रम आयोजित केला होता. स्वच्छतेवर पथनाट्य सादर करण्यात आले. वाळू शिल्पातून "प्लॅस्टिकमुक्ती'चा संदेश दिला जात होता. चौपाट्यांचा विकास आणि जनजागृतीकरिता "एमएमबी'च्या वतीने स्थानिकांना वाळू शिल्पाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला संयुक्त राष्ट्रसंघाचे भारताचे मुख्य प्रतिनिधी विजय सन्मोत्रा, "एमएमबी'चे सीईओ अतुल पाटणे आदी उपस्थित होते. 

"एमएमबी'चे कॉफीटेबल बुक 
"एमएमबी'ने केलेल्या कामाची माहिती जनतेला मिळावी, याकरिता कॉफीटेबल बुक तयार केले आहे. या बुकमध्ये विविध कामांचे प्रत्यक्षात फोटो आहेत. तसेच "एमएमबी'च्या उपक्रमांची माहिती यात असणार आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचे बुक "एमएमबी'ने तयार केले आहे.

मुंबई

मुंबई - मुंबईला मंगळवारी (ता.20) रात्रीपर्यंत तुफानी हिसका दाखवणाऱ्या पावसाने बुधवारीही मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड...

06.03 AM

नवी मुंबई -  महापालिकेतील कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा "जोरात' जाणार असून, स्थायी समितीपाठोपाठ...

03.12 AM

नवी मुंबई - राज्यात या वेळी चांगला पाऊस झाल्याने भाजीपाल्याच्या उत्पदनात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न...

02.39 AM