मुख्य आरोपी मुख्यमंत्र्यांच्या दरबारी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

कल्याण - कल्याण - नेवाळी विमानतळाच्या भूसंपादनाविरुद्ध गुरुवारी नेवाळी परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी आंदोलकांवर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्या वेळी नेवाळी जाळपोळीतील मुख्य आरोपी चैनू जाधव शिवसेना नेत्यांसह उपस्थित होते. यासंदर्भाचे छायाचित्र व्हायरल झाल्याने दिवसभर चर्चेला उधाण होते. 

चैनू जाधव हे नेवाळी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष आणि नेवाळी पाड्याचे सरपंच आहेत. त्यांच्यासह इतर शेकडो आंदोलकांवर सशस्त्र दंगलीसह इतर काही गुन्हे दाखल आहेत. जाधव हे दंगलीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, शनिवारी जाधव शिवसेनेच्या नेत्यांसह मुख्यमंत्र्यांच्या दरबारी उपस्थित असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले. 

""चैनू जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याबाबत मला काही कल्पना नाही. मात्र, आंदोलनप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल असून, पोलिस त्यांच्या शोधात आहेत. अनेक आरोपी घराला कुलूप लावून फरारी आहेत. '' 
- सुनील भारद्वाज, पोलिस उपायुक्त, उल्हासनगर परिमंडळ