महिला डॉक्‍टरची गळफास घेऊन आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

मुंबई - महापालिकेच्या गोरेगाव येथील शताब्दी रुग्णालयात इंटर्नशिप करणाऱ्या महिला डॉक्‍टरने गुरुवारी (ता. 9) गळफास घेऊन आत्महत्या केली. सय्यद मेहजबदीन मोईनोदीन नसरीन (24) असे तिचे नाव आहे. सय्यद घाटकोपरच्या आझादनगरमध्ये राहत होती. ती बुधवारी ड्यूटी संपवून हॉस्टेलमधील खोलीवर गेली होती. सकाळी ती बाहेर न आल्याने तिची मैत्रीण तिच्या खोलीत गेली असता तिला गळफास घेतल्याचे आढळले. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. सय्यदने दुपारी नातेवाइकांना फोन केला होता. रात्री कुटुंबीयांनी तिला फोन केला; परंतु तो उचलला गेला नाही.

मुंबई - महापालिकेच्या गोरेगाव येथील शताब्दी रुग्णालयात इंटर्नशिप करणाऱ्या महिला डॉक्‍टरने गुरुवारी (ता. 9) गळफास घेऊन आत्महत्या केली. सय्यद मेहजबदीन मोईनोदीन नसरीन (24) असे तिचे नाव आहे. सय्यद घाटकोपरच्या आझादनगरमध्ये राहत होती. ती बुधवारी ड्यूटी संपवून हॉस्टेलमधील खोलीवर गेली होती. सकाळी ती बाहेर न आल्याने तिची मैत्रीण तिच्या खोलीत गेली असता तिला गळफास घेतल्याचे आढळले. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. सय्यदने दुपारी नातेवाइकांना फोन केला होता. रात्री कुटुंबीयांनी तिला फोन केला; परंतु तो उचलला गेला नाही. ती कामात व्यग्र असावी, असे समजून नातेवाइकांनी तिला पुन्हा फोन केला नाही; परंतु सकाळी त्यांना तिने आत्महत्या केल्याची बातमी ऐकल्यावर त्यांना धक्का बसला. मुंबईत डॉक्‍टरने आत्महत्या केल्याची ही चौथी घटना आहे. 

Web Title: mumbai news women doctor suicide