धमकीच्या दूरध्वनीनंतर मुंबईच्या सुरक्षेत वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

मुंबई - मुंबईत बॉंबस्फोट घडवण्याच्या निनावी दूरध्वनीमुळे आज तपास यंत्रणांची एकच धावपळ झाली. या दूरध्वनीनंतर रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी मुंबई सेंट्रल स्थानकात तपासणी केली. या ठिकाणी काहीही संशयास्पद आढळले नाही, परंतु दक्षता म्हणून महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्यात आली.

रेल्वेच्या 182 या हेल्पलाइनवर बुधवारी (ता. 23) दुपारी मुंबईत बॉंबस्फोट घडवण्याची धमकी देणारा दूरध्वनी आला. ही माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) नियंत्रण कक्षाने मुंबई पोलिसांसह रेल्वे लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळवली. त्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या. खबरदारी म्हणून लोहमार्ग पोलिसांनी पश्‍चिम रेल्वेतील मुंबई सेंट्रलसह महत्त्वाच्या स्थानकांची तपासणी केली. त्यामध्ये काहीही संशयास्पद आढळले नाही. तपास यंत्रणांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत; तर मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीही मध्य रेल्वेच्या परळ स्थानकात बॉंबस्फोट घडवण्याची धमकी देणारा निनावी दूरध्वनी आला होता.

Web Title: mumbai security increase after warning telephone