'महापालिकांना मिळणार 25 लाखांचे पारितोषिक'

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 जून 2018

मुंबई - शंभर टक्के प्लास्टिकबंदी करणाऱ्या राज्यातील महापालिकेस 25 लाख, नगरपालिकेस 15 लाख; तर सहा महसूल विभागांतील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीस 10 लाख रुपयांचे पारितोषिक पर्यावरणदिनी देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या जागतिक पर्यावरण दिन सोहळ्यातील पर्यावरणविषयक पारितोषिक वितरण कार्यक्रमात कदम बोलत होते. या वेळी राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, अपर मुख्य सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्‌बलगन उपस्थित होते. 

राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील म्हणाले, ""पर्यावरण विभागाने मिशन प्लास्टिकबंदी हे काम हाती घेऊन ते यशस्वी करून दाखवले आहे. प्लास्टिकमुळे नदी-नाल्यांना येणारा महापूर, प्लास्टिक वस्तूंच्या वापरामुळे होणारे गंभीर आजार, तापमानात झालेली वाढ यामुळे जगभर चिंता वाढली आहे. प्रत्येक व्यक्तीने किमान शंभर लोकांना प्लास्टिकबंदी निर्णयाची माहिती दिल्यास आपले राज्य शंभर टक्के प्लास्टिकमुक्त होईल.'' 

गवई म्हणाले, "प्लास्टिकबंदीची माहिती गावागावांत पोहोचली आहे. या मोहिमेला एका चळवळीचे स्वरूप आले आहे. आपल्या राज्यात मिळणारा प्रतिसाद पाहता तमिळनाडू राज्यानेही आपल्याकडील कायद्याची माहिती घेऊन 1 जानेवारी 2019 पासून तेथेही प्लास्टिकबंदीचा निर्णय जाहीर केला आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक वस्तू वापरण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. अन्‌बलगन यांनी प्रास्ताविकातून प्लास्टिकच्या दुष्परिणामाची माहिती देऊन कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती सांगितली. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वसुंधरा पुरस्कार, लघु चित्रपट स्पर्धा, फोटोकॉन स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. या वेळी लोकराज्य मासिकाच्या पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी केले. याच कार्यक्रमात हवा गुणवत्ता संनियंत्रण योजनेचा शुभारंभ, प्लास्टिकबंदी मोबाईल ऍपचा शुभारंभ करण्यात आला. तसेच जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन ऑनलाईन संगणकीय प्रणालीचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी प्लास्टिकबंदीची शपथही देण्यात आली. 

Web Title: Municipal corporation to get 25 lakhs prize money