पाणी तुंबू न देण्याकडे महापालिकेचे लक्ष - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

मुंबई - किती टक्के नालेसफाई झाली? या प्रश्‍नात मला रस नाही. मुळात मुंबईत पावसाचे पाणी तुंबू न देण्याकडे महापालिकेचे लक्ष आहे. गेल्या वर्षी पाणी तुंबले नाही. या वेळीही महापालिका दक्ष आहे. कुठेही पाणी तुंबणार नाही, याची काळजी महापालिका घेईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी मंगळवारी मुंबईतील नालेसफाईची पाहणी केली.

मुंबई - किती टक्के नालेसफाई झाली? या प्रश्‍नात मला रस नाही. मुळात मुंबईत पावसाचे पाणी तुंबू न देण्याकडे महापालिकेचे लक्ष आहे. गेल्या वर्षी पाणी तुंबले नाही. या वेळीही महापालिका दक्ष आहे. कुठेही पाणी तुंबणार नाही, याची काळजी महापालिका घेईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी मंगळवारी मुंबईतील नालेसफाईची पाहणी केली.

ठाकरे यांनी माहिम येथील रहेजा रुग्णालयाच्या मागील मिठी नदी, वांद्रे (पूर्व) येथील वांद्रे-कुर्ला संकुलालगतची वाकोला नदी, कुर्ला (पश्‍चिम) येथील एमटीएनएल ब्रिजजवळील मिठी नदी, अंधेरी (पश्‍चिम) येथील जुहू एअरपोर्टमधील इर्ला नाला; तसेच जोगेश्‍वरी (पश्‍चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्गालगतच्या वालभट, ओशिवरा नदी या ठिकाणांची पाहणी करून नालेसफाईबद्दल समाधान व्यक्त केले. या वेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृहनेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, जवळपास 20 वर्षांपासून मी नालेसफाईची पाहणी कर्तव्य म्हणून करत आहे. अनेक ठिकाणी सुधारणा झाल्या आहेत. नाल्यांचे रुंदीकरण झाले आहे. या वर्षीही नालेसफाईचे काम सुरू आहे. किती टक्के सफाई झाली या प्रश्‍नात मला रस नाही. मुळात पाणी तुंबू न देण्याकडे महापालिकेचे लक्ष आहे. गेल्या वर्षी पाणी तुंबले नाही. या वेळीही पालिका दक्ष आहे. कुठेही पाणी तुंबणार नाही, याची दक्षता महापालिका घेईल, असे ते म्हणाले.

नाल्यांतून काढलेला गाळ कोणत्याही परिस्थितीत तातडीने उचलला जाईल. याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना पालिका प्रशासनास दिल्या असल्याचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी स्पष्ट केले.

50 टक्के नालेसफाई पूर्ण
यंदाच्या नालेसफाई मोहिमेत मुंबईतील मोठ्या व छोट्या नाल्यांमधून पावसाळ्यापूर्वी काढण्यात येणाऱ्या 70 टक्के गाळांपैकी सुमारे 50 टक्के गाळ काढण्याची कामे पूर्ण झाली आहेत, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

मुंबई

8 ते 10 कोटींचा व्यापार ठप्प मुंबईः भाद्रपद अमावस्या संपत आली असून, दक्षिण मुंबईतील हक्काची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेला...

03.36 PM

ठाणे : ठाण्यात पावसाची रिपरिप सुरूच असुन मागील 24 तासात 151 मिमी पावसाची नोंद झाली. वेधशाळेने दिलेल्या अतिवृष्टीच्या...

12.51 PM

मुंबई : मागील तीन महिन्यांपासून चाललेले मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळाचे...

10.03 AM