नोटा प्रभाव वाढतोय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

महापालिका निवडणुकीत सुमारे 88 हजार नोटा
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा तब्बल 87 हजार 719 मतदारांनी नन ऑफ द अबाव्ह अर्थात नोटाचा (NOTA) वापर केल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. ठाणे महापालिकेतही 81 हजार 888 मतदारांनी या पर्यायाचा वापर केल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

महापालिका निवडणुकीत सुमारे 88 हजार नोटा
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा तब्बल 87 हजार 719 मतदारांनी नन ऑफ द अबाव्ह अर्थात नोटाचा (NOTA) वापर केल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. ठाणे महापालिकेतही 81 हजार 888 मतदारांनी या पर्यायाचा वापर केल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

निवडणूक मशीनमध्ये (ईव्हीएमवर) नोटाचा पर्याय असावा, अशी मागणी 2004 पासून होती. त्यासाठी अनेक व्यक्ती आणि संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्या सर्वांची एकत्रित सुनावणी घेण्यात आली होती. न्यायालयाने सप्टेंबर 2013 मध्ये याचिका दाखल करून घेत निवडणूक आयोगाने असा पर्याय उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ईव्हीएमवर 2014 मध्ये पहिल्यांदाच नोटाचा पर्याय उपलब्ध करून दिला. ईव्हीएमवर सर्व पक्षांच्या उमेदवारांसह नोटा हा पर्याय उपलब्ध असतो. वरील उमेदवारांपैकी एकही उमेदवाराला पसंती नसेल, तर मतदार नोटाचा वापर करू शकतात.

मुंबईत नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत वांद्रे पूर्वमधील वॉर्ड क्रमांक 91 मध्ये सर्वाधिक 1 हजार 135 मतदारांनी नोटाचा वापर केला. या वॉर्डमधून शिवसेनेच्या शगून नाईक यांचा विजय झाला आहे; तर दक्षिण मध्य मुंबईतील वॉर्ड क्रमांक 198 मध्ये 964 मतदारांनी नोटा या पर्यायाचा उपयोग केला. या वॉर्डमधून विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर विजयी झाल्या आहेत; तर नोटाचा सर्वात कमी वापर मानखुर्दमधील वॉर्ड क्रमांक 47 मध्ये झाला असून 134 मतदारांनी नोटाचा वापर करून कोणत्याही उमेदवाराच्या पारड्यात मत दिले नाही. या मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या उमेदवार शायरा खान यांचा विजय झाला.

16 व्या लोकसभा निवडणुकीत नोटाचा वापर करणाऱ्या मतदारांचे प्रमाण लक्षणीय ठरले आहे. महाराष्ट्रात 4 लाख 31 हजार 992 नागरिकांनी या पर्यायाचा वापरला होता. यात राज्यातील नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली जिल्ह्यात नोटाचा वापर सर्वाधिक झाला. तब्बल 24 हजार 488 मतदारांनी नोटा अधिकार वापरत कोणालाही मत दिलेले नाही. रायगड जिल्ह्यातही 20 हजार 362 मतदारांनी नोटा वापरला होता.

Web Title: municipal nota button user increase