पालिका शाळांमध्ये ‘सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

मुंबई - पालिका शाळांमध्ये एक कोटींच्या सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग आणि बर्निंग मशीन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी यंदाच्या पालिका अर्थसंकल्पात पहिल्यांदाच तरतूद केली अाहे. मनसेने या मशीनसाठी पाठपुरावा केला होता. राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्ये त्या बसवण्यासाठी मनसेने सरकारकडे आग्रह धरला आहे.

‘स्वच्छतागृह माझा अधिकार’ आणि सीआरएस चळवळीअंतर्गत महिलांसाठी ६५ सार्वजनिक स्वच्छतागृह आणि शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवले आहेत. हे काम सरकारमार्फत केले जावे यासाठी मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सरकारकडे आणि पालिकेकडे आग्रह धरला होता. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची त्यांनी भेट घेऊन महाविद्यालयांमध्येसुद्धा सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवाव्यात अशा सूचना केल्या होत्या. पालिका आयुक्त अजोय मेहता यांना भेटून पालिकेच्या शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवाव्यात म्हणून आग्रह धरला. अखेर मुंबई पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात या मागणीचा आंतर्भाव केल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. हाच उपक्रम राज्यभर राबवण्याची मागणी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले.