अंधेरीत महिलेची एकतर्फी प्रेमातून हत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई  - अंधेरी येथील पादचारी पुलावर बुधवारी (ता. 4) रात्री एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या झाली. अन्नाबिबी आमीर शेख (वय 28) असे तिचे नाव आहे. या प्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी शबीर हारून शेख याला अटक केली. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, 16 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शबीर हा गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचा असून, दोन वर्षांपूर्वी त्याला बनावट नोटांप्रकरणी अटक करण्यात आली होती. 

पहिला पती मारहाण करत असल्याने अन्नाबिबी हिने दुसरे लग्न केले होते. ती मूळची झारखंडची रहिवासी होती. तेथे साहेबगंज गावातील शबीरसोबत तिची ओळख होती. शबीर हा मशीद बंदर येथे पदपथावर राहतो. त्याचा मासेविक्रीचा व्यवसाय आहे. त्याचे अन्नाबिबीवर एकतर्फी प्रेम होते.

Web Title: murder of a woman by one-sided love