शिवसेनेच्या आगपाखडीवर भाजपचा काणाडोळा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मुंबई - नाणार प्रकल्प तसेच नगर येथे झालेल्या हत्येप्रकरणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असा निर्णय भाजपने अनौपचारिकपणे घेतला आहे. शिवसेनेने सलग दोन दिवस भाजप नेतृत्वावर टीका केली असतानाही भाजपने कोणतेही उत्तर दिलेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेने सातत्याने टीका केली आहे. यापूर्वी टीका केवळ सामना या मुखपत्राचे संपादक खासदार संजय राऊत करायचे; पण आता संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करताना उद्धव ठाकरे यांनी स्वत:च भाजपला लक्ष्य केले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवणार असताना शिवसेनेने बरोबर राहावे, अशी भाजपची इच्छा आहे. शिवसेनेलाही एकत्र येणे आवश्‍यक आहे याची जाणीव असल्याने काही काळानंतर हा विरोध शमेल, असे भाजपत मानले जाते.

Web Title: nanar project shivsena BJP politics