नवी मुंबई पालिकेच्या तिजोरीत 75 कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

नवी मुंबई - चलनातून 500 व हजारच्या नोटा बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय राज्यातील नगरपालिका व महापालिकांसाठी फायद्याचा ठरला आहे. जुन्या नोटा संपवण्यासाठी नागरिकांनी पाणीबिल व मालमत्ता कराची थकीत बिले भरण्यावर भर दिल्याने नवी मुंबई महापालिकेच्या तिजोरीत 15 दिवसांत 75 कोटींची भर पडली आहे. त्यामुळे पालिकेची थकबाकीदारांच्या मागे तगादा लावण्यापासून सुटका होणार आहे.

महापालिकेची थकीत पाणीबिले व मालमत्ता कराची थकीत देयके वसूल करण्याकरिता अनेकदा ग्राहकांमागे तगादा लावावा लागत होता. परंतु, केंद्र सरकारने चलनातून नोटा रद्द करून फक्त मालमत्ता कर व पाणीबिल भरण्यासाठी सवलत दिल्याने हा निर्णय पालिकेच्या फायद्याचा ठरला आहे. यातील सर्वाधिक रक्कम मालमत्ता कराची आहे. पाणीबिलातून सुमारे चार कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. यातील 32 कोटींची रक्कम जुन्या नोटांमधून जमा झाली आहे. 39 कोटी रुपये धनादेशातून जमा झाले आहेत. नागरिकांना जुन्या नोटांमधून थकीत देयके चुकती करण्यासाठी 24 तारखेपर्यंतची मुदत दिली होती. त्याचा फायदा घेत अनेकांनी थकलेली बिले जुन्या नोटांच्या माध्यमातून चुकती केली आहेत. त्यासाठी मालमत्ता कर व पाणीबिलाचा भरणा करण्यासाठी कार्यालयाच्या वेळेतही बदल करून मध्यरात्रीपर्यंत भरणा केंद्रे सुरू ठेवली होती.

15 दिवसांतील स्थिती
- मालमत्ता करात सर्वाधिक वसुली
- पाणीबिलातून चार कोटी
- धनादेशातून 39 कोटी
- जुन्या नोटा 32 कोटी