तुर्भेतील वृद्धेच्या खूनप्रकरणी आरोपीला जळगावात अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

नवी मुंबई - तुर्भे सेक्‍टर-22 मधील जमुना निवासमधील सुमन बबन हांडे (वय 70) यांचा खून करणाऱ्या विजय आत्माराम बनसोडे (वय 27) याला एपीएमसी ठाण्याच्या पोलिसांनी जळगाव येथे अटक केली. वृद्धेचा खून केल्यानंतर तो सुरतला पळून गेला होता. तेथून तो जळगाव येथील मूळ गावी आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून हांडे यांच्या घरातील चोरलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. 

सुमन हांडे तुर्भे सेक्‍टर-22 मधील जमुना निवास इमारतीमधील खोली नंबर दोनमध्ये एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा भाईंदरमध्ये तर इतर तीन विवाहित मुली वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. गेल्या आठवड्यात सुमन हांडे यांचा घरात मृतदेह सापडला होता. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती; मात्र त्या वेळी त्यांचा मुलगा प्रवीण याने घरामधील सोन्याचे दागिने व मोबाईल फोन चोरीला गेल्याची माहिती पोलिसांना देऊन चोरट्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात सुमन हांडे यांच्या मोबाईल कॉलची तपासणी केली तेव्हा तुर्भे एमआयडीसीतील विजय बनसोडे याच्यावर पोलिसांना संशय आला. त्यांनी त्याची चौकशी केली तेव्हा तो सुरतला व तेथून नंतर जळगावला गेल्याचे समजले. नंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने खून केल्याचे कबूल केले. सुमन हांडे यांनी विजयकडे गॅझेटसाठी पैसे दिले होते; मात्र बरेच दिवस झाले तरी त्याने ते बनवून दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याला शिवीगाळ केली होती. यामुळे चिडलेल्या विजयने त्यांचा खून करून दागिने लुटले होते, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: navi mumbai news accused arrested in Jalgaon