राष्ट्रवादीची मुंबईत "परिवर्तन' सभा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

मुंबई - शिवसेना-भाजपची मुंबई महापालिकेतील सलग वीस वर्षांची सत्ता उलथून टाकण्याचा निर्धार करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी रविवार (ता. 20) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत "परिवर्तन' सभा आयोजित केली आहे. 

सध्या देशात नोटाबंदीचे तीव्र पडसाद उमटत असताना या सभेत शरद पवार नेमके काय बोलतात, याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर यांनी संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी आतापासूनच राष्ट्रवादीने प्रचाराचा बिगुल वाजवण्याची तयारी सुरू केली आहे. ईशान्य मुंबई आणि उत्तर-मध्य मुंबई या दोन जिल्ह्यांसाठीची पहिली परिवर्तन सभा रविवारी सायंकाळी घाटकोपरमध्ये होणार आहे, अशी माहिती सचिन अहीर यांनी दिली.