मुंढेंच्या निर्णयांची होणार चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

नवी मुंबई - पालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांमुळे अडचणीत आलेल्या लोकप्रतिनिधींनी पुन्हा एकदा मुढेंविरोधात सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त असताना मुंढेंनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला आहे. यासाठी सदस्यांची तर्दथ समिती स्थापन करून निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याचे आदेश महापौर सुधाकर सोनवणे यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

नवी मुंबई - पालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांमुळे अडचणीत आलेल्या लोकप्रतिनिधींनी पुन्हा एकदा मुढेंविरोधात सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त असताना मुंढेंनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला आहे. यासाठी सदस्यांची तर्दथ समिती स्थापन करून निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याचे आदेश महापौर सुधाकर सोनवणे यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

राष्ट्रवादीचे नगरसेवक रवींद्र इथापे यांनी मुंढेंच्या निर्णयाची चौकशी करण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला. तसेच चौकशी करण्यासाठी महापालिकेने एका तर्दथ समितीची स्थापना करण्याची मागणी केली. महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून ठोक मानधनावर कर्मचारी काम करत असताना मुंढेंनी कोणालाही विश्वासात न घेता बाह्य यंत्रणांमार्फत नेमणुका करण्याचा प्रस्ताव आणला. या संदर्भात निविदा प्रक्रियाही सुरू केली होती; मात्र त्याचा खर्च हाताबाहेर जात असल्याने मुंढेंना तो प्रस्ताव पुन्हा गुंडाळून ठेवावा लागला. यात महापालिकेचे दोन कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप इथापे यांनी केला. महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी वापरलेली ई-गव्हर्नन्सची निविदा प्रक्रियासुद्धा सभागृहाची परवानगी न घेता राबवल्याने महापालिकेचे चार कोटींचे नुकसान झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

मुंढे यांनी घेतलेले निर्णय बेकायदा 
आयुक्त तुकारम मुंढे यांच्या काळात पाठवलेला आकृतिबंध महासभेच्या परवानगीविना पाठवला असल्याने बेकायदा आहे. घणसोली नोड हस्तांतरणात झालेले नुकसान, महासभेच्या निर्णयांची पायमल्ली करणे, महासभेला विश्वासात न घेता अधिकाऱ्यांना निलंबित करणे वा त्यांची नियुक्ती करणे, अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करणे, यासोबतच उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर झालेला खर्च असे अनेक ठपके मुंढेंच्या कारवाईवर ठेवण्यात आले आहे. 

मुंढेंनी घेतलेल्या निर्णयांमुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी केला आहे. नगरसेवक नामदेव भगत यांनी आयुक्त मुंढे यांनी बढत्या दिलेले अधिकारी कुचकामी ठरले आहेत. ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई केल्या आहेत, त्या आकसापोटी केल्या असून त्यांची पुन्हा चौकशी करून अन्यायकारक कारवाईतून सुटका करावी, अशी मागणी केली. शिवसेनेचे नगरसेवक संजू वाडे आणि राष्ट्रवादीच्या अपर्णा गवते यांनीही मुंढेंवर टीका केली. 

निवृत्त न्यायाधीशामार्फत होणार मुंढेंची चौकशी 
सभागृहात सर्वच लोकप्रतिनिधींनी एकमताने चौकशी करण्याबाबतच्या प्रस्तावाला पाठिंबा दिल्यानंतर महापौर सुधाकर सोनवणे यांनी प्रस्ताव मंजूर केला. तसेच पक्षीय बलानुसार 15 सदस्यांची तर्दथ समिती नेमण्याचे आदेश प्रशासनाला देत निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.

मुंबई

मुंबई - मुंबईला मंगळवारी (ता.20) रात्रीपर्यंत तुफानी हिसका दाखवणाऱ्या पावसाने बुधवारीही मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड...

06.03 AM

नवी मुंबई -  महापालिकेतील कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा "जोरात' जाणार असून, स्थायी समितीपाठोपाठ...

03.12 AM

नवी मुंबई - राज्यात या वेळी चांगला पाऊस झाल्याने भाजीपाल्याच्या उत्पदनात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न...

02.39 AM