'भाजप उत्तर भारतीयांना कॉंग्रेसविरोधात भडकवतेय '

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

घाटकोपर - कॉंग्रेसमुळेच उत्तर भारतीय मुंबईत सुरक्षित आहेत. आगामी महापालिका निवडणुक जिंकण्यासाठी भाजप उत्तर भारतीयांना कॉंग्रेसविरोधात भडकावत आहे. अर्धवट कामे पूर्ण करण्याऐवजी नवीन कामांच्या उद्‌घाटनाचा बाजार मांडत भाजपने नौटंकी सुरू केली असल्याची टीका मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी मंगळवारी (ता.3) घाटकोपर येथील रामलीला मैदानात उत्तर भारतीयांच्या संमेलनात केले. 

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उत्तर भारतीयांचा अजेंडा ठरवण्यासाठी मुंबई कॉंग्रेसतर्फे उत्तर भारतीय संमेलन घेतले होते. या कार्यक्रमाला खासदार संजय सिंह, वाराणसीचे आमदार अजय राय, जौनपूरचे आमदार नदीम जावेद व माजी मंत्री आरिफ नसीम खान उपस्थित होते. या वेळी हजारोच्या संख्येने उत्तर भारतीय संमेलनास उपस्थित होते. उत्तर भारतीयांना संबोधित करताना संजय निरुपम म्हणाले की, "हा मेळावा उत्तर भारतीयांना भाजपपासून सावध करण्यासाठी घेतला आहे. शिवसेना-भाजपच्या कार्यकाळात मुंबईत उत्तर भारतीय असुरक्षित आहेत. दिवसरात्र मेहनत करून व्यवसाय करणाऱ्या उत्तर भारतीयांवर महापालिका कारवाई करते. कारवाई करून त्यांना बेरोजगार करायचे आणि निवडणुकीच्या तोंडावर याच उत्तर भारतीयांकडे मतांचा जोगवा मागायचा. मतांसाठी उत्तर भारतीयांचा वापर करणाऱ्यांना येत्या निवडणुकीत धडा शिकवण्याचे आवाहन निरुपम यांनी केले. 

संमेलनामध्ये संजय निरुपम यांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर भारतीयांसाठी वचनपत्रही सादर केले. यामध्ये मुंबई महापालिकेत कॉंग्रेसची सत्ता आल्यास उत्तर भारतीयांसाठी संरक्षण कायदा संमत करू. झोपडपट्टीत राहणाऱ्यांची घरे पक्की करत 20 फूट उंचीपर्यंत घर बांधण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच उत्तर भारतीय रिक्षाचालकांना परमिट देऊन त्यांना भाषेची सक्ती न करता त्यांच्यासाठी कॉंग्रेस निर्णायक प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. 

Web Title: north indian safe for congress