नोटाबंदीवर शिवसेनेची भूमिका दुतोंडी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

ठाणे - नोटाबंदीवर शिवसेनेची भूमिका दुतोंडी आहे. ती शोभनीय नाही, अशी टीका भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष ऍड. आशीष शेलार यांनी येथे केली. मतांची सरमिसळ करण्याऐवजी एकदाची काळ्या पैशाच्या बाजूने अथवा विरोधात भूमिका जाहीर करावी, असे जाहीर आव्हान त्यांनी या वेळी शिवसेनेला दिले. 

राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी आशीष शेलार येथे आले होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला मारताना टोकाची भूमिका घेण्यासाठी मागे-पुढे पाहणार नसल्याचे वक्तव्य केल्याने त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. 

बॅंकेच्या रांगेत उभ्या राहिलेल्या प्रत्येकाला त्रास होत असला, तरी ते काळ्या पैशाच्या विरोधात आणि सरकारच्या बाजूनेच असल्याचा दावा शेलार यांनी केला. ते म्हणाले, शिवसेना सध्या द्विधा मनस्थितीत आहे. सद्यपरिस्थितीत नोटाबंदी विषयावर ती गोंधळली आहे. कधी ते मनमोहन सिंह यांचे कौतुक करतात; तर कधी शरद पवार पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करतात. कधी ममतामध्ये कालिमातेला पाहतात, अशा वेगवेगळ्या भूमिका घेण्यापेक्षा पक्षाने एकदाच काय ती टोकदार भूमिका घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. 

काळ्या यादातील ठेकेदारांना काम न देण्याचा इशारा 
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत. ठाण्यातही भाजप क्रमांक एकचा पक्ष होऊ शकेल, असा दावा आशीष शेलार यांनी केला. मुंबईत ज्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे, त्यांना कामे दिली जात नाहीत; परंतु ठाण्यात जर अशा पद्धतीने काळ्या यादीतील ठेकेदारांना कामे दिली जात असतील, तर महापौरांनी याची तत्काळ दखल घ्यावी. अशा ठेकेदारांना कामे देऊ नयेत; अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने ती बंद करावी लागतील, असा इशाराही त्यांनी ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेला दिला. 

Web Title: Notabandi on Shiv Sena role