मुंबईत मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 सप्टेंबर 2016

मुंबई - मुंबई परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, शुक्रवारी रात्री मुलुंडमध्ये संरक्षक भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडमधील शास्त्रीनगर भागात ही घटना घडली आहे. जोरदार पावसामुळे भिंत कोसळल्याने भिंतीशेजारील घरांवर ती कोसळली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 16 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत 17 वर्षांचा मृत्यू झाला आहे. 3 ते 4 घरांवर ही भिंत कोसळली आहे.