अन्य भाषांतील साहित्य अकादमीने हिंदीत आणावे - विनोद तावडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

मुंबई - राज्यातील सांस्कृतिक ठेवा जपताना विविध साहित्यिकांचे योगदान जपण्याचे काम महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने केले आहे. आजही ही अकादमी विविध पातळ्यांवर साहित्यिकांची नोंद घेते, त्यांच्या साहित्याचे संवर्धन करते. इतर भाषांतील उच्च दर्जाचे साहित्य हिंदी भाषेत उपलब्ध झाल्यास साहित्यिकांचा हा ठेवा चहू दिशांना पोहचेल. याकरता महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीने विविध भाषांतील साहित्याचा अनुवाद करावा, असे मार्गदर्शन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केले.

सोमवारी के. सी. महाविद्यालयातील महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. केरळातील मल्याळी अकादमीकडून देश-विदेशातील साहित्याचा अनुवाद केला जातो. त्याच धर्तीवर हिंदी अकादमीनेही काम करावे, असे ते म्हणाले. या पुरस्कार सोहळ्यात डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. राम मनोहर त्रिपाठी, डॉ. सूर्यबाला, हरीश पाठक, विमल मिश्र, अनंत शेवडे, डॉ. देवेश ठाकूर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Web Title: other language sahitya in hindi