outside food banned in theater yuvasena protests
outside food banned in theater yuvasena protests

बाहेरील अन्नपदार्थ नेण्यास मनाई; सिनेमागृहावर युवासेना कार्यकर्त्यांची धडक

पनवेल - सिनेमागृहात बाहेरील अन्न पदार्थ घेऊन जाण्यास मनाई करणाऱ्या पनवेल मधील पी.व्ही.आर सिनेमागृहाला धडक देत शिवसेना युवा सेना कार्यकर्त्यांनी सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाला जाब विचारला. पनवेल मधील नामांकित अशा ओरियन मॉल मधील पी.व्ही.आर सिनेमागृह आहे.

योगेश चव्हाण हे (ता.३१) परिवारासोबत सिनेमा पाहायला गेले असता, सिनेमागृहात कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेरील अन्न पदार्थ नेण्यास अटकाव केला. याबाबत चव्हाण यांनी सिनेमागृहातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला, सिनेमागृहात बाहेरील अन्न पदार्थ नेण्यास कायद्याने परवानगी दिली असल्याकडे चव्हाण यांनी सिनेमागृह व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही ऐकुन घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या सिनेमागृहात कर्मचाऱ्यांनी अरेरावी करत चव्हाण याना सिनेमागृहाबाहेर काढले.

दरम्यान सर्व घटनेचे चित्रीकरण चव्हाण यांनी आपल्या मोबाईलद्वारे केल्याने, मोबाईलमधील चित्रीकरण काढून टाकण्यासाठी चव्हाण यांच्यावर सिनेमागृह व्यवस्थापनाकडून दबाव टाकण्यात आला. मात्र दबावाला बळी न पडता चव्हाणांनी केलेले चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल केल्याने घटनेचं गांभीर्य ओळखून चव्हाण याना न्याय देण्यासाठी शिवसेना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी ( ता.1) पी व्ही आर सिनेमावर धडक देत सिनेमागृह कर्मचाऱ्यांकडून देण्यात आलेली वागणूकीचा जाब विचारत सिनेमागृहांमध्ये खाद्यपदार्थ नेण्यासाठी केलेला अटकाव हा कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आला व त्यांनी सदर घटनेचा पुरावा म्हणून केलेले चित्रीकरण थांबवत त्यांना उर्मटपणे तुमच्या कर्मचार्यानी बाहेर हाकलण्यासाठी उचललेली पाऊले कोणत्या नियमानुसार उचलली गेली याचा जाब विचारला. मात्र यावर पीव्हीआर प्रशासनाकडूण योंग्य उत्तर देण्यात न आल्याने युवा सेना असे गैरप्रकार खपवुन घेणार नसुन असा प्रकार पुन्हा घडल्यास युवासेनेकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देन्यात आला. यावेळी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे, जिल्हाधिकारी मयूर जोशी, उपजिल्हाधिकारी अवचित राउत, जिल्हा समन्वयक नितीन पाटील, पनवेल विधानसभा अधिकारी पराग मोहिते, शहरप्रमुख प्रथमेश सोमण उपस्थीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com