पालघर: पुराच्या पाण्यात वाहून गेला रस्ता, शेताचे बांध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

वाडा - पालघर जिल्ह्यातील वाडा येथे शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरांडा गावाजवळील घोडमाळ-बोरांडा रस्ता वाहून गेला असून अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे बांधही पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

वाडा तालुक्‍यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या व नाल्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्यात रस्ता आणि अनेक शेतकऱ्यांचे बांधही वाहून गेले आहेत. पावसाने तालुक्‍यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. घोडमाळ-बोरांडा रस्त्यावरील बोरांडा येथील पुलाजवळील भाग वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद पडली आहे. ता कुडूस येथील अनेक शेतकऱ्यांचेही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. इरफान सुसे या शेतकऱ्याचा शेताचा बांध वाहून गेल्याने त्यांचे सुमारे तीन एकर शेतीचे नुकसान झाले आहे. याच गावातील पंढरीनाथ चौधरी, रमेश जाधव या शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. कोनसई येथे नवीन पुलाचे सुरू असल्याने तेथे तात्पुरता रस्ता बनविण्यात आला होता. मात्र हा रस्ताही पावसामुळे वाहून गेला आहे. रस्त्याजवळ उभी असलेली मोटारसायकल आणि पुलाच्या बांधकामाचे साहित्यही वाहून गेले आहे.