पोलिस अधिकाऱयाच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

दिलीप पाटील
शनिवार, 13 जानेवारी 2018

गुन्हा दाखल करण्यात पोलिसांची चालढकल

वाडा (पालघर): वाडा तालुक्यातील चिंचघर येथील येथील एका तरूणाने पोलिस अधिका-याच्या जाचाला कंटाळून गेल्या बुधवारी (ता. 10 ) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाला तीन दिवस होऊनही अद्यापही वाडा पोलिसांकडून गुन्हा नोंदवला गेलेला नसून, तो नोंदवण्यात चालढकल केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

गुन्हा दाखल करण्यात पोलिसांची चालढकल

वाडा (पालघर): वाडा तालुक्यातील चिंचघर येथील येथील एका तरूणाने पोलिस अधिका-याच्या जाचाला कंटाळून गेल्या बुधवारी (ता. 10 ) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाला तीन दिवस होऊनही अद्यापही वाडा पोलिसांकडून गुन्हा नोंदवला गेलेला नसून, तो नोंदवण्यात चालढकल केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

कृपाल दाजी पाटील (वय 28) या तरूणाचे नजीकच्या गावातील तरूणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, तिचे आणखी दोन तरूणांशी प्रेमसंबंध असल्याचे समजल्यानंतर कृपाल आणि त्या तरूणीत वाद झाला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी कूडूस पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शाहूराज रणवारे यांच्याकडे तोंडी तक्रार केली. तक्रार केल्यानंतर कृपाल याला 22 डिसेंबर 2017 रोजी पोलिस चौकीत बोलावून त्याला मारहाण केली. शिवाय, खोटा गुन्हा दाखल करून तुला जेलमध्ये टाकू असा सज्जड दम भरून दोन लाख रुपयांची मागणी केली.

कृपाल याने घाबरून 23 ते 27 डिसेंबर या कालावधीत एक लाख रुपये पोलिस अधिका-याला दिले. त्यानंतरही आणखी पैशांची मागणी करून त्याचा छळ करू लागले. अखेर या जाचाला कंटाळून कृपाल याने बुधवारी सायंकाळी थायमेट हे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला उपचारासाठी अंबाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याने सुसाईट नोट लिहून ठेवून सोशल मीडियावर व्हायरल केली.

या सुसाईड नोटची दखल पालघरचे पोलिस अधीक्षक मंजुनाथ शिंगे यांनी घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक शाहूराज रणवारे यांना तडकाफडकी निलंबित केले.
व त्यांची विभागीय चौकशी सुरू केली.

दरम्यान, तीन दिवस होवूनही अद्यापही वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला नाही. याबाबत पोलिस निरीक्षक रवींद्र नाईक यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाचा तपास पालघर येथील पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून केला जात असल्याचे सांगितले. तर पोलिस खात्याअंतर्गत तपास करणारे पालघरचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेगाजे यांच्याशी संपर्क साधला असता गुन्हा नोदवण्याचे काम वाडा पोलिस करतील मला फक्त खात्या अंतर्गत तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले असून, मी तो अहवाल त्यांना सादर करीन अशी माहिती त्यांनी दिली.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरूणाचे नातेवाईक गेली दोन दिवस वाडा पोलिस ठाण्यात हेलपाटे मारीत आहे. मात्र, त्यांची तक्रार वाडा पोलिस नोंदवून न घेता तपास पालघरकडे आहे तेच गुन्हा दाखल करतील, असे सांगून चालढकल पणा केला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Web Title: palghar news wada tried to suicide the police officers sprain