ऐन रणधुमाळीत झोपडीधारकांना दंडाच्या नोटिसा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

ठाणे - निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी झोपडपट्टीधारकांना दंडाच्या नोटिसा बजावून भीतीचे वातावरण निर्माण केले आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. झोपडपट्टीधारकांना तब्बल 18 हजार 592 रुपयांच्या दंडाच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून कोणीही दंडाची रक्कम भरू नये, असे आवाहन राष्ट्रवादीने केले आहे. याविरोधात आंदोलन करू, असा इशारा शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे. 

ठाणे शहरातील झोपडीधारकांना तहसील कार्यालयाने बेकायदा बांधकामापोटी 18 हजार 252 रुपये दंड जमा करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात या नोटिसा म्हणजे, सामान्यांना घाबरवण्याचा प्रकार आहे, असा आरोप करून येथील गोरगरीब कोणत्याही पक्षाचा असो, ते पैसे भरणार नाहीत; या नोटिसा तत्काळ मागे घ्या, अशी मागणी परांजपे यांनी केली आहे. 

शहरातील अनेक झोपडीधारकांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 19966 चे कलम 50 (4) चा आधार घेऊन नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सात दिवसांच्या आत पैसे जमा करावेत; ही रक्कम म्हणजे एक चतुर्थांश दंड आहे, असे त्यात नमूद आहे. या नोटिसा म्हणजे, निवडणुकीच्या काळात सामान्य नागरिकांना घाबरवून नंतर सरकारने तुम्हाला माफी दिली, असे भासवण्याचा प्रयत्न आहे. अर्थात, हा प्रकार म्हणजे प्रलोभनच आहे, असा आरोप परांजपे यांनी केला आहे.

Web Title: Penalty notices to slum aera