डॉपलर रडारसाठी या महिन्यातच जमीन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

मुंबई - भारत मौसम विज्ञान विभागातर्फे (आयएमडी) मुंबईत लावण्यात येणाऱ्या दुसऱ्या "डॉपलर' रडारसाठी महिन्याअखेरीस जमीन देणार आहोत, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात दिली.

मुंबई - भारत मौसम विज्ञान विभागातर्फे (आयएमडी) मुंबईत लावण्यात येणाऱ्या दुसऱ्या "डॉपलर' रडारसाठी महिन्याअखेरीस जमीन देणार आहोत, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात दिली.

मुंबईतील हवामानाचा अंदाज घेणारे एक रडार सध्या कुलाबा येथे आहे. शहरातील गगनचुंबी इमारतींमुळे निरीक्षणात अडथळे येत असल्याने दुसरे रडार लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेरावली उच्च जलाशयाच्या अतिरिक्त जागेवर ते लावण्यात येणार आहे. मार्चअखेर मुंबई महापालिकेकडून तत्काळ हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईल, असे पालिकेच्या वकिलांनी सांगितले. डॉपलर लावण्यासाठी येणाऱ्या खर्चाबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, असेही सांगण्यात आले.

राज्य आणि केंद्र सरकारमध्ये याबाबत सकारात्मक चर्चा आणि लेखी पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती सरकारने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली. त्यावर हे सर्व लेखी पुरावे प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले.

वर्षाला 900 रुपये भुईभाडे
मुंबई शहरात 26 जुलै 2005 रोजी सर्वत्र पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत अटलबिहारी दुबे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वेरावली उच्चस्तर जलाशयाच्या भूखंडापैकी 900 चौरस मीटर जमीन आणि रस्त्यासाठी लागणारी जागा 30 वर्षांच्या भाडेपट्टा तत्त्वावर देण्यात आली आहे. वर्षाला 900 रुपयांचे भुईभाडे 30 वर्षे भरावे लागेल.

Web Title: place for dopler radar