पोलादपूरजवळ अपघातात 1 ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

महाड - मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर तालुक्‍यातील दिवील गावानजीक आज दुपारी तीन वाहनांच्या अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला, तर सात जण जखमी झाले. दिवील गावाजवळ दुपारी तीनच्या सुमाराला स्विफ्ट मोटार भरधाव मुंबईहून चिपळूणकडे जात होती. त्याच वेळी या मोटारीने पोलादपूरहून महाडकडे येणाऱ्या इको कार आणि रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर ती रस्त्यालगतच्या नाल्यामध्ये कोसळली. या अपघातात स्विफ्ट मोटारीचा चालक डॅनिसिया फर्नांडिस (वय 24, रा. सांताक्रूझ, मुंबई) गंभीर जखमी झाला. त्याला महाड येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले; मात्र तो उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
Web Title: poladpur news one death in accident