स्मार्ट ठाण्यातील उमेदवार अल्पशिक्षित 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

ठाणे - देशातील स्मार्ट शहरांशी स्पर्धा करणाऱ्या ठाणे शहराच्या पालिका निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांत अल्पशिक्षित उमेदवारांची संख्याच अधिक असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे भाजप, शिवसेना, मनसे आणि कॉंग्रेस आघाडीकडून देण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये सरासरी एक उमेदवार चक्क अंगठेबहाद्दर असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून पुढे आले आहे. या उमेदवारांनी कोणत्याही शाळेमध्ये गेलो नसल्याचा दावा प्रतिज्ञापत्रात केला आहे. तर प्रत्येक पक्षामध्ये 40 टक्‍क्‍यांहून अधिक उमेदवारांनी नववीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

ठाणे - देशातील स्मार्ट शहरांशी स्पर्धा करणाऱ्या ठाणे शहराच्या पालिका निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांत अल्पशिक्षित उमेदवारांची संख्याच अधिक असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे भाजप, शिवसेना, मनसे आणि कॉंग्रेस आघाडीकडून देण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये सरासरी एक उमेदवार चक्क अंगठेबहाद्दर असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून पुढे आले आहे. या उमेदवारांनी कोणत्याही शाळेमध्ये गेलो नसल्याचा दावा प्रतिज्ञापत्रात केला आहे. तर प्रत्येक पक्षामध्ये 40 टक्‍क्‍यांहून अधिक उमेदवारांनी नववीपर्यंत शिक्षण घेतले आहे. पालिका निवडणुकीसाठी बहुतांश सर्वच पक्षांनी अशा अल्पशिक्षित उमेदवारांना उमेदवारी दिली असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडे भरलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. 

ठाणे पालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, मनसे आणि कॉंग्रेस आघाडी या प्रमुख चार पक्षांकडून शहरातील बहुसंख्य प्रभागांमध्ये निवडणूक लढवली जात आहे. या उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांवरून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा अंदाज मतदारांना येऊ लागला आहे. भाजपकडून 120 जागा लढवल्या जात असून त्यापैकी 108 उमेदवारांची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. यामधील तीन उमेदवारांनी तर शाळेची पायरी कधीच चढलेली नाही. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडून 137 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये असून त्यापैकी एक उमेदवार अंगठाबहाद्दर आहे. तर शिवसेनेच्या 119 उमेदवारांपैकी एक उमेदवार अशिक्षित असून मनसेच्या 99 पैकी दोन उमेदवारांचे कोणत्याही प्रकारचे शालेय शिक्षण झाले नसल्याची माहिती त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट झाली आहे. 

पदवी शिक्षणातील गफलती... 
निवडणूक लढवत असताना उमेदवारांच्या अल्प शिक्षणाचा मुद्दा चर्चिला जाणार हे माहिती असल्यामुळे अनेक उमेदवारांनी पदवी शिक्षणाचा अभ्यास करत असल्याचा देखावा निर्माण केला आहे. मुक्त विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासाला प्रवेश घेऊन अनेकांनी पदवीपर्यंत शिक्षण असल्याचे दाखवले आहे. काही मंडळींनी मुंबई विद्यापीठाशिवाय अन्य मुक्त विद्यापीठांच्या पदव्यांच्या आधारे आपली शैक्षणिक पात्रता दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. 

शाळेत न गेलेल्या अपक्षांची संख्याही मोठी... 
निवडणूक म्हणजे हौसे, नवशे आणि गवशे मंडळींची जत्रा झाली आहे. अनेक अपक्ष उमेदवारांनी कोणतीही सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी नसताना उमेदवारी दाखल केली आहे. काही शिक्षित अपक्षही या निवडणुकीत प्रस्थापित अल्पशिक्षितांशी लढा देत आहेत. तर काही ठिकाणी अपक्षही अल्पशिक्षित; तसेच कधीच शाळेत न गेलेलेही आहेत. 

भाजपा राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना मनसे 

अशिक्षित 3- 0- 1- 1- 2 

पाचवीपर्यंत- 8- 11- 1- 13- 7 

नववीपर्यंत- 24- 19- 7- 26- 28 

दहावी- 21- 17-6- 15- 25 

बारावी- 16- 20- 7- 31- 8 

पदवीपर्यंत- 4- 1- 1- 3- 2 

उच्चशिक्षित- 32- 17- 14- 25- 24 

माहिती उपलब्ध नाही- 12- 20- 15- 5- 3 

एकूण- 120- 85- 52- 119- 99 

(निवडणूक आयोगाकडे सादर माहितीनुसार) 

मुंबई

मुंबई - आमचा नंदीबैल दररोज शेकडो आबालवृद्धांना आशीर्वाद देतो... आज आमच्या कुटुंबाला त्याच्या आशीर्वादाची आवश्‍यकता आहे......

05.06 AM

ठाणे - ठाणे स्थानकात उभारण्यात आलेल्या महात्त्वाकांक्षी सॅटीस पुलाला गळती लागली आहे. पावसाचे पाणी थेट पुलाखालून मार्गक्रमण...

04.15 AM

नवी मुंबई - आठवडाभर अधूनमधून पडणाऱ्या पावसाची शनिवारपासून संततधार सुरू झाली. त्यामुळे शहरातील रस्तेदुरुस्ती पुन्हा खड्ड्यांत गेली...

04.03 AM