शायना यांच्या फेसबुकवर अश्‍लील टिप्पणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

मुंबई - फेसबुकवर अश्‍लील टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या शायना एन. सी. यांनी शनिवारी मलबार हिल पोलिस ठाण्यात उत्तर प्रदेशमधील आझमगड येथील शेख अझमल आझमी याच्याविरुद्ध तक्रार दिली.

मुंबई - फेसबुकवर अश्‍लील टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या शायना एन. सी. यांनी शनिवारी मलबार हिल पोलिस ठाण्यात उत्तर प्रदेशमधील आझमगड येथील शेख अझमल आझमी याच्याविरुद्ध तक्रार दिली.

शायना यांच्या राजकीय प्रवासाची माहिती देणारे वृत्त एका वृत्तवाहिनीवर दाखवण्यात येणार होते. त्याबाबतची माहिती सर्वांना मिळावी, यासाठी शायना यांनी त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर कार्यक्रमाची माहिती व प्रक्षेपणाची वेळ पोस्ट केली होती. त्यांच्या पोस्टवर शेखने अश्‍लील टिप्पणी केली. शायना यांच्या खासगी सचिवाने याबाबत त्यांना माहिती दिली. त्यानुसार त्यांनी याप्रकरणी मलबार हिल पोलिसांकडे तक्रार केली. शायना यांनी यापूर्वीही अशा प्रकारांना न घाबरता महिलांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले होते. त्यासाठी एक हेल्पलाइनही सुरू केली होती.

Web Title: porn comment on shina nc facebook account