सोशल मीडियावरील नोटीस हा पुरावाच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

मुंबई - व्हॉट्‌सऍप आणि ई-मेलवरून पाठवलेली नोटीस पुरावा मानून प्रतिवादी पक्षकाराला न्यायालयीन प्रकरणाची माहिती मिळाली आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालात स्पष्ट केले आहे.
क्रॉस टेलिव्हिजन या कंपनीने एका चित्रपट कंपनीच्या विरोधात केलेल्या खटल्याची नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

स्वामित्व हक्काविषयीच्या आरोपांबाबत हा खटला करण्यात आला आहे. त्याची नोटीस याचिकाकर्त्याने कंपनीला पाठवली होती. त्यावर कोणतेही स्पष्टीकरण कंपनीने केले नव्हते. त्यामुळे याचिकाकर्त्याच्या वतीने वकिलांनी कंपनीला व्हॉट्‌सऍप आणि ई-मेलवर नोटीस पाठवली होती. त्यावर कंपनीने उत्तरादाखल संदेशही पाठविल्याचा दावा न्यायालयात केला.

यामुळे एकप्रकारे कंपनीला या दाव्याची माहिती आहे, असे गृहीत धरून न्यायालयाने दाव्याची सुनावणी चालू ठेवली; मात्र संबंधित ई-मेल किंवा व्हॉट्‌सऍप मेसेजमार्फत समन्स न पाठवता रीतसर न्यायालयीन कार्यवाहीनुसार समन्स बजावावे, असेही न्यायाधीश गौतम पटेल यांनी स्पष्ट केले. कन्नड चित्रपटाच्या कथेसंबंधीच्या स्वामित्व हक्काबाबतचा हा दावा होता.