उन्हाळ्यातील घरफोड्या टाळण्यासाठी जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नवी मुंबई - शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत नागरिक गावी किंवा फिरायला जातात. या वेळी घरफोड्यांचे प्रमाण वाढते. त्या टाळण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी जनजागृती सुरू केली असून नागरिकांना आवश्‍यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 

सुट्टीत अनेक कुटुंब बाहेरगावी जातात. नेमकी हीच संधी साधून चोरटे घरफोड्या करतात. त्यानंतर पोलिसांवर आगपाखड केली जाते. परंतु चोरी होऊ नये यासाठी नागरिकांकडून कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही, उपाययोनजा केली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून घरफोडीसारख्या घटना घडू नये, यासाठी विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे. 

बाहेरगावी जाताना दारे, खिडक्‍या काळजीपूर्वक बंद कराव्या, वॉचमन नेमताना त्यांची माहिती घ्यावी, भाडेकरू ठेवताना तो पूर्वी कुठे राहत होता, त्याची सामाजिक पार्श्‍वभूमी काय? याची माहिती घ्यावी, दागिने व मौल्यवान वस्तू बॅंकांच्या लॉकरमध्ये ठेवाव्या; आदी सूचना नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना केल्या आहेत.

Web Title: Public awareness to avoid summer house robbery