न्यायालयीन सुनावणीला राहुल गांधी गैरहजर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

भिवंडी - भिवंडी न्यायालयात कॉंग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्याची आज सुनावणी झाली. सुनावणीला राहुल गैरहजर राहिले. त्यांच्या वतीने वकील नारायण अय्यर यांनी बाजू मांडली. पक्षाच्या कामात व्यग्र असल्याने राहुल सुनावणीला हजर राहू शकले नसल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.

याप्रकरणी पुढील सुनावणी 28 जुलै रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल यांनी प्रचार सभेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भिवंडीचे कार्यवाहक राजेश कुंटे यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी सध्या सुनावणी सुरू आहे.