विद्यार्थ्यांनी केले पावसाळी पाण्याचे नियोजन

Water-Tank
Water-Tank

कल्याण - जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होत असल्याने पावसाळी पाण्याचे नियोजन करण्याचे आधुनिक संस्कार कल्याणमधील शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना दिले आहेत. शतक महोत्सव साजरा करणाऱ्या मध्य रेल्वेच्या शाळेने शिक्षणाबरोबर उत्तम संस्कार आणि सजन नागरिक घडवण्याचे काम करून इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. 

पाण्यासाठी राज्यभर विविध कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. पाण्यासाठी गावागावात चळवळ उभी केली जात आहे. सर्व गोष्टींना सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वेची शाळा पावसाळी पाण्याचे नियोजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 
मुरबाड रोडवर तीन एकरच्या प्रशस्त जागेत मध्य रेल्वेची शाळा वसली आहे.

शाळेला असलेल्या विस्तीर्ण मैदानाचे आकर्षण सर्वांना आहे. परिसरात अनेक वर्षांपासून विविध झाडांची जोपासना करण्यात आली आहे. शाळेची वास्तू अनेक वर्षांपूर्वी बांधलेली असल्यामुळे या ठिकाणी त्या काळानुसार पावसाळी पाण्याचा निचरा होणारी यंत्रणा होती. अनेक वर्षे येथील झाडांना याच पाण्याचा आधार मिळत होता. त्यात काही सुधारणा करण्यात आल्या होत्या; मात्र त्या कामाला आता शास्त्र शुद्ध तंत्राची जोड देण्यात आली. रोटरी क्‍लबच्या माध्यमातून यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे आता पावसाचे पाणी शुद्ध करून भूगर्भात सोडले जाणार आहे. उपक्रमाचा फायदा परिसरातील नागरिकांनाही होणार आहे. मध्य रेल्वेच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रयत्न केले जातात. रेल्वे प्रशासनाकडूनही अनेक उपक्रम राबवले जातात. 

शाळेतील अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत असतात. आता त्यांना काळानुरूप आवश्‍यक असलेल्या गोष्टी शिकवल्या जात आहेत.

असे होणार पाण्याचे पुनर्भरण
शाळेच्या सायन्स इमारतीच्या छतावरून पावसाचे पाणी गोळा करून नजिकच्या बोअरवेलमध्ये कृत्रिम पुनर्भरण करण्यात येणार आहे. इमारतीच्या छताचे क्षेत्रफळ एकूण ५२३ वर्ग मीटर आहे. ज्यामुळे साधारण वर्षाला १०४६ घनमीटर तर पावसाळ्यात प्रतिदिन ११६०० लिटर पाणी गोळा करून बोअरवेलद्वारे भूगर्भात पुनर्भरण करता येणार आहे. प्रकल्पात ऑनलाईन रूफ टॉप फिल्टरेशन सिस्टमचा वापर केला गेला आहे. ज्यामुळे भूगर्भात स्वच्छ पाणी पुनर्भरण करण्यास मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com