मोहम्मद रफी यांच्या चाहत्यांचा मूक मोर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

मुंबई - 'ऐ दिल है मुश्‍किल' या चित्रपटातील मोहम्मद रफी यांचा अपमान करणारा संवाद काढून टाकावा आणि या चित्रपटाचे निर्माते करण जोहर यांनी माफी मागावी, अशी मागणी करत "रफी फॅन्स क्‍लब'ने बुधवारी वांद्रे येथे मूक मोर्चा काढला.

मुंबई - 'ऐ दिल है मुश्‍किल' या चित्रपटातील मोहम्मद रफी यांचा अपमान करणारा संवाद काढून टाकावा आणि या चित्रपटाचे निर्माते करण जोहर यांनी माफी मागावी, अशी मागणी करत "रफी फॅन्स क्‍लब'ने बुधवारी वांद्रे येथे मूक मोर्चा काढला.

'ऐ दिल है मुश्‍किल' या चित्रपटात अनुष्का शर्मा हिच्या तोंडी "मोहम्मद रफी गाते कम, रोते ज्यादा थे' असा संवाद आहे. यामुळे मोहम्मद रफी यांचे चाहते दुखावले गेले आहेत. रफी यांचे कुटुंबीयही नाराज झाले आहेत. या मोर्चात सहभागी झालेले बिपीन पंडित यांनी सांगितले की, "मोहम्मद रफी हे आपल्या देशाला लाभलेले अनमोल रत्न असून त्यांच्यावर करण्यात आलेली अशा प्रकारची टिप्पणी आम्ही सहन करणार नाही. करण जोहरसारख्या प्रतिष्ठित व्यक्‍तीकडून ही अपेक्षा नव्हती. अशा मोठ्या व्यक्‍तींनीच भान ठेवले पाहिजे. करण जोहरने माफी मागितलीच पाहिजे. त्याच्या चित्रपटाचे नावही मोहम्मद रफी यांच्या गाण्याचीच ओळ असूनही त्याला असले डायलॉग देताना लाज कशी वाटली नाही? अनुष्का शर्मानेही हा संवाद म्हणताना विचार करायला हवा होता. तिने स्वत: विचार करून हा संवाद म्हणण्यास नकार द्यायला हवा होता. करणने माफी मागितली नाही आणि चित्रपटातील संवाद काढून टाकला नाही, तर त्याच्यावर बदनामी केल्याचा खटला दाखल करणार आहोत.

मुंबई

मीरा-भाईंदर - मीरा-भाईंदर महापालिकेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळवत सत्ता मिळविली. भाजपने जोरदार...

05.33 AM

तुर्भे - महापालिकेच्या विविध विभागांतील कंत्राटी कामगारांनी सोमवारी (ता. २१) पालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून किमान...

04.27 AM

नवी मुंबई - अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या महापालिकेच्या आकृतिबंधावर अखेर राज्य सरकारने सोमवारी शिक्कामोर्तब केले....

03.27 AM