अल्पवयीन मुलीवर विरारमध्ये बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

नालासोपारा - लग्नाच्या भूलथापा देऊन विरारमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असून, मुंबईतील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विरार पोलिसांत गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे.

पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. दोन महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार सुरू होता. ही मुलगी गर्भवती राहिल्याने ही घटना उघड झाली. त्यानंतर मुलीच्या आईने विरार पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपीने तिच्या घराशेजारी बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले.