धार्मिक स्थळी ध्वनिवर्धक वापरणे चुकीचेच - सोनू

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुंबई - गायक सोनू निगम याने "अजान'मुळे पहाटे झोपमोड होत असल्याचे ट्विट केल्यानंतर याबाबत सगळीकडे संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यावर मंगळवारी सोनूने पुन्हा ट्विट करून "धार्मिक स्थळी ध्वनिवर्धकाचा वापर करणे चुकीचेच आहे' असे म्हटले आहे.

सोनूने सोमवारी (ता. 17) भल्या पहाटे 5.45 वाजता ट्‌विटरवरून "सगळ्यांना देव सुखी ठेवो. मी मुस्लिम नसूनही मला रोज पहाटे अजानच्या ध्वनिवर्धकावरून येत असलेल्या आवाजामुळे उठावे लागते. भारतात धर्म लादणे कधी थांबणार आहे', असा सवाल त्याने केला होता. मंगळवारी त्याने पुन्हा ट्विट करत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले आहे. "धार्मिक स्थळी ध्वनिवर्धकाचा वापर करणे चुकीचे आहे. माझे वक्तव्य विपर्यास करण्याएवढे अस्पष्ट होते का?' असेही त्याने विचारले आहे.