संजय दत्तविरोधात अजामीनपात्र वॉरंट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

मुंबई - चित्रीकरण अर्धवट सोडून आर्थिक नुकसान केल्याचा आरोप असलेल्या अभिनेता संजय दत्तविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने आज अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

मुंबई - चित्रीकरण अर्धवट सोडून आर्थिक नुकसान केल्याचा आरोप असलेल्या अभिनेता संजय दत्तविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने आज अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

"जान की बाजी' या चित्रपटाचे निर्माते शकील नुरानी यांनी संजय दत्तविरोधात फिर्याद दिली आहे. 14 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या चित्रीकरणातून त्याने नंतर अंग काढून घेतले, असा आरोप आहे. नुरानी यांनी निर्माता संघटनेकडे याबाबत तक्रार केली होती. संजयने घेतलेली रक्कम परत करण्याचे आदेश संघटनेने दिले होते. तरीही पैसे न मिळाल्यामुळे त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला. सुनावणीला सतत गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात वॉरंट जारी केले. पुढील सुनावणी 29 ऑगस्टला आहे.