चिकू बागायतदारांना पीक विम्याची भरपाई मिळणार

अच्युत पाटील
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

बोर्डी : चिकू बागायतदारांना लवकरच पीक विम्याची भरपाई मिळणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य चिकूउत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी सकाळला दिली.

बोर्डी : चिकू बागायतदारांना लवकरच पीक विम्याची भरपाई मिळणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य चिकूउत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी सकाळला दिली.

पंतप्रधान पिक वीमा योजनेतंर्गत 2017 च्या खरीप हंगामात शेकडो बागायतदारांनी हंगामी पीक वीमा सुरक्षा कवच मिळणे करिता स्थानिक बँकेच्या माध्यमातून हेक्टरी 2500 रुपये भरून प्रस्ताव सादर केले होते. खरीप हंगामात 1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान हवामानात सलग पाच दिवस नव्वद टक्के पेक्षा जास्त आद्रता राहिल्यास हेक्टरी पंचवीस हजार रुपये आणि सलग दहा दिवस नव्वद टक्के पेक्षा जास्त आद्रता टिकून राहिल्यास हेक्टरी पन्नास हजार रुपये वीमा बागायतदारांना अदा करावयाचा आहे.

2017 खरीप हंगामासाठी बजाज अलायंन्स जनरल इंश्युरंस कंपनीला हे काम सोपविण्यात आले होते.या हंगामात अतिवृष्टी व अवकाळी पावसाने बागायतीचे प्रचंड नुकसान झाले होते.

कृषी फलोद्यान विभागाच्या नियमानुसार 15 नव्हेंबर 2017 च्या आत वीमा कंपनीने बागायतदारांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करणे अपेक्षित होते. मात्र बजाज अलायंन्स इंशुरंस कंपनीचे अधिकारी काहीही बोलण्यास तयार नव्हते.

सकाळ दैनिकातून बागायतदारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी नुकतीच फलोद्यान खात्याचे संचालक विकास पाटील यांची भेट घेऊन पीक वीमा विषयावर चर्चा केली.

Web Title: sapotas farmer got insurance compensation