विद्यापीठातील सुरक्षा वाढवण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात आणि ग्रंथालयात 24 तास प्रवेश दिल्याने या परिसराची सुरक्षाव्यवस्था वाढवावी, असे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिले आहे. अभाविपच्या वतीने ईश्‍वर चव्हाण आणि आफताब शेख यांनी मंगळवारी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना ही विनंती केली.

कालिना संकुलातील सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, संरक्षक भिंतीची उंची, पथदिव्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे, असे निवेदनात म्हटले आहे. "मराठी भाषा भवना'जवळच्या तलावातील अस्वच्छतेकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

Web Title: security increase deamnd for university