वेगळे राहण्यासाठी पतीवर दबाव हा छळच

सुनीता महामुणकर
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

मुंबई - वेगळे राहण्यासाठी पती व त्याच्या आई-वडिलांशी सतत वाद घालणे हा मानसिक छळच आहे, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने घटस्फोटाविरोधात पत्नीने केलेली याचिका नामंजूर केली.

आई-वडिलांपासून पतीने वेगळे व्हावे आणि त्यांच्यासोबत राहू नये, यासाठी पती आणि सासू-सासऱ्यांशी सतत वाद घालण्याचा प्रकार नात्यांमध्ये ताणतणाव निर्माण करणारा आहे. वाद झाला तरी एकत्र राहून दोघांनीही समजुतीने वागले तर अनेक समस्या टळू शकतात. तसे न करता केवळ पतीवर मानसिक दबाव निर्माण करून त्याला आई-वडिलांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न हा मानसिक छळ असून, त्यामुळे नात्यांत बाधा येते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

कल्याण कुटुंब न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा निर्णय न्यायालयाने कायम केला आहे. या याचिकेवर न्या. आर. डी. धनुका यांनी निकालपत्र दिले आहे. सासू-सासऱ्यांशी सतत भांडणे करणाऱ्या पत्नीमुळे पतीने आई-वडिलांसोबत स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे अधिक नाराज झालेल्या पत्नीने मुलीलाही वडील आणि आजी-आजोबांशी बोलण्यास मनाई केली होती. वडिलांशी बोलल्यास मुलीच्या करिअरवर परिणाम होईल, असा दावा पत्नीने केला होता. न्यायालयाने तो अमान्य केला. पतीने मुलीची सर्व जबाबदारी घेण्याची तयारी न्यायालयात दर्शवली. तिच्या शिक्षणासाठी महिना 15 हजार रुपये देण्याचेही त्याने मान्य केले.