घराचे प्रलोभन दाखवून सात कोटींची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

मुंबई - घराचे प्रलोभन दाखवून सात कोटी 35 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी सात जणांविरोधात कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्कम मोठी असल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. 

याबाबत तक्रार करणारे डॉक्‍टर मालाडमध्ये राहतात. पाच वर्षांपूर्वी त्यांची एका बांधकाम व्यावसायिकाशी ओळख झाली होती. या विकसकाचे कांदिवलीतील हिंदुस्तान नाक्‍यावर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीत तक्रारदाराने घर बुक केले होते. त्यासाठी काही रक्कम दिली होती; मात्र करारानुसार विकसकाने घराचा ताबा दिला नाही. ते घर परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकले, असा विकसकावर आरोप आहे. विकसकासह सात जणांनी 25 जणांची तब्बल 7 कोटी 35 लाखांची फसवणूक केली. डॉक्‍टरने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली.