'सेक्स रॅकेट'; शिवसेना महिला संघटकला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

मुंबई - उल्हासनगरमध्ये सेक्स रॅकेट चालवत असल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या महिला शाखा संघटक शोभा गमलाडु यांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील कॅम्प 1 येथील शिवसेना शाखा संघटक शोभा गमलाडु यांना शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. कल्याणमधील बिर्ला महाविद्यालयासमोरील ‘ड्यूक्स‘हॉटेल मधून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबरोबरच काही महिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. हॉटेलच्या मॅनेजर आणि रिक्षा चालकाला ही पोलिसांनी अटक केली आहे.

शोभा गमलाडु यांना अटक झाल्याने उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या महिला संघटक असल्याने त्यांच्याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.