मुंबई-नाशिक महामार्गावर टॅंकरमधून वायूगळती

मुंबई-नाशिक महामार्गावर टॅंकरमधून वायूगळती

शहापूर - मुंबई-नाशिक महामार्गावरील चेरपोली पोलिस चौकीसमोर गॅस व ट्रकमध्ये सोमवारी झालेल्या अपघातात टॅंकरमधील वायूची गळती झाल्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती.

मुरबाड येथील टेक्‍नोग्राफ कंपनीत कार्बन डायऑक्‍साईड घेऊन आज सकाळी टॅंकर जात होता. चेरपोली घाटातील कांबारे गावाजवळ उतरणीवर वळण घेत असताना टॅंकरला भरधाव ट्रकची धडक बसली. या अपघातात दोन्ही वाहने महामार्गाच्या बाजूला असलेल्या 15 फूट खड्ड्यात पडल्याने चालक गंभीर जखमी झाले. अपघातानंतर टॅंकरमधून वायुगळती सुरू झाल्याने घबराट पसरली. चेरपोली महामार्ग पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून दोन्ही दिशेकडील वाहतूक थांबविली. या अपघास्थळापासून आमदार पांडुरंग बरोरा यांचे घर जवळ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com