लोकलमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

शहापूर - आसनगाव रेल्वे स्थानकातून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा खाली पडून मृत्यू झाला.

शहापूर - आसनगाव रेल्वे स्थानकातून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा खाली पडून मृत्यू झाला.

प्रथमेश पाटील (कल्याण) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आसनगाव येथील शिवाजीराव जोंधळे कॉलेजमध्ये अभियांत्रिकी पदविकेच्या द्वितीय वर्षात तो शिकत होता. आज महाविद्यालय लवकर सुटल्याने त्याने आसनगावहून लोकल पकडली. तो गाडीच्या दरवाजात उभा राहून प्रवास करीत होता; मात्र आसनगाव ते वाशिंददरम्यान तो गाडीतून खाली पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला.