शौर्यपदक विजेत्यांचा मालमत्ताकर रद्द?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

मुंबई - मुंबईत राहणारे लष्करातील शौर्यपदक विजेते जवान आणि सैनिकांच्या विधवांना मालमत्ताकर माफ करावा, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेने विधी समितीपुढे मांडला आहे.

मुंबई - मुंबईत राहणारे लष्करातील शौर्यपदक विजेते जवान आणि सैनिकांच्या विधवांना मालमत्ताकर माफ करावा, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेने विधी समितीपुढे मांडला आहे.

मालमत्ताकर माफ करण्याची मागणी अनेक वर्षांपासून महापालिकेत होत होती; मात्र पालिकेच्या कायद्यात तशी तरतूद नसल्याने ही मागणी पूर्ण करणे अशक्‍य होते. पालिकेच्या कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्तावही राज्य सरकारकडे पाठवला होता. जुलै 2016 मध्ये शौर्यपदकविजेते जवान आणि सैनिकांच्या विधवांच्या मालमत्तांचाकर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार पालिकेनेही हा कर माफ करण्याचा प्रस्ताव विधी समितीपुढे मांडला आहे. हा ठराव विधी समितीपाठोपाठ स्थायी समिती आणि महासभेत मंजूर झाल्यानंतर मालमत्ताकर रद्द होईल. मुंबईत असे 10 हजार 935 शैर्यपदक विजेते जवान आणि नऊ हजार 196 जवानांच्या विधवा आहेत.