शिवसेना कार्यकर्त्यांनी वाचविले गर्भवतीचे प्राण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

शिवसेनेचे उमेदवार उपेंद्र सावंत यांचा टागोरनगरमध्ये प्रचार सुरू होता. त्या वेळी ही घटना घडली. 

विक्रोळी - ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत टागोरनगरमध्ये शनिवारी (ता. 10) माणुसकीचे दर्शन घडले. एका गर्भवतीला रस्त्यातच प्रसुती वेदना सुरू झाल्या होत्या. त्या वेळी असाह्य असलेल्या या महिलेच्या मदतीला शिवसेनेच्या तीन महिला धावल्यामुळे बाळ-बाळंतिणीचे प्राण वाचले. 

शिवसेनेचे उमेदवार उपेंद्र सावंत यांचा टागोरनगरमध्ये प्रचार सुरू होता. त्या वेळी ही घटना घडली. 

आशा पवार (27) ही गवंडीकाम करणारी महिला टागोरनगर येथे भावाकडे राहते. दुपारी 12.30 वाजता ती शनी मंदिरात जात होती. त्या वेळी तिला रस्त्यातच प्रसुती वेदना सुरू झाल्या आणि ती प्रसूत झाली. या वेळी प्रचार करत असलेल्या शिवसेनेच्या श्रद्धा रुके, मधुरा जोशी, वासंती शिंदे या महिला कार्यकर्त्यांनी क्षणाचाही विचार न करता तिच्या मदतीसाठी धाव घेत मातेसह बालकाचे प्राण वाचवले. श्रद्धा रुके या परिचारिका आहेत. त्यांच्यामुळेच महिलेला वेळेवर उपचार मिळणे शक्‍य झाले. मदत वेळेवर मिळाली नसती, तर बाळाला जंतूसंसर्ग होण्याची भीती होती. या महिलांनी माता आणि बाळाला रुग्णालयात दाखल केले आहे. 

Web Title: shiv sena activist saves womens life