शिवसेना-भाजपवर सर्वाधिक सट्टा 

ऊर्मिला देठे- सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार, याची उत्सुकता मतदारांबरोबरच सट्टेबाजारालाही आहे. या निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती तुटल्याने या दोन पक्षांवरच सर्वाधिक सट्टा लावला जात आहे. 

निवडणुकांत सर्वच राजकीय पक्ष उतरले असले तरी खरी लढत शिवसेना-भाजपमध्येच होणार आहे. त्यामुळे यंदाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. या दोन पक्षांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकणार, याबरोबरच काही भागांतील लढतींवरही विशेष बेटिंग घेतली जात आहे. सट्टा लावणाऱ्यांमध्ये गुजराती व सिंधी समाजातील व्यक्तींची संख्या अधिक आहे. 

मुंबईत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकासाठी शिवसेना-भाजप युतीत लढत असेल. कॉंग्रेस तिसऱ्या क्रमांकावर असेल, असा सट्टेबाजाराचा अंदाज आहे. ठाण्यात त्रिशंकू कौल मिळेल, असा सट्टेबाजांचा होरा असून त्यासाठी 90 पैशांचा दर निश्‍चित झाला आहे. तेथील कमाई 50 कोटींच्या वर जाण्याची शक्‍यता नसल्याने अनेकांनी उल्हासनगरवर लक्ष केंद्रीत केल्याचे एका बुकीने सांगितले. 

23 फेब्रुवारीला निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्यानंतरच्या पहिल्या सोमवारी 

पैशांची देवाणघेवाण होणार आहे. आंगडिया (कुरियर) या नेहमीच्या पद्धतीसोबतच दोन लाखांपर्यंतचे व्यवहार यंदा ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहेत, अशी माहितीही त्याने दिली.